Ad will apear here
Next
अभिनेता अद्वैत दादरकर सहा जुलैला देवरुखात
देवरुख (संगमेश्वर) : चतुरंग प्रतिष्ठानच्या ‘मुक्तसंध्या’ या उपक्रमांतर्गत अभिरुची-देवरुख यांच्या सहकार्याने सुप्रसिद्ध युवा अभिनेता, दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सहा जुलैला संध्याकाळी सहा वाजता देवरुतील पित्रे प्रायोगिक कलामंच येथे होणार आहे.

यात प्रा. मीनल ओक या दादरकर यांची मुलाखत घेणार असून, या मुलाखतीदरम्यान रसिकांना दादरकर यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाला देवरुखवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चतुरंग प्रतिष्ठान आणि ‘अभिरुची’तर्फे करण्यात आले आहे. 

कार्यक्रमाविषयी :
दिवस : शनिवार, सहा जुलै २०१९ 
वेळ : सायंकाळी सहा वाजता 
स्थळ : पित्रे प्रायोगिक कलामंच, देवरुख. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZVZCC
Similar Posts
रत्नागिरीत सप्रे स्मृती खुली बुद्धिबळ स्पर्धा रत्नागिरी : सन १९५५मधील पहिल्यावहिल्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेते आणि दोन वेळा जागतिक ऑलिंपियाड स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेले रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रत्नागिरीमध्ये खुल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ व १०
‘गोगटे-जोगळेकर’च्या मराठी वाङ्मय मंडळाचे यश रत्नागिरी : राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग यांच्या वतीने साडवली (देवरुख) येथे जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या पाच विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली.
‘गोगटे-जोगळेकर’मध्ये तीन ऑगस्टला ‘मैत्र’चे आयोजन रत्नागिरी : चतुरंग प्रतिष्ठान आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मैत्र’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम तीन ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत महाविद्यालयातील राधाबाई शेट्ये सभागृहात होईल.
माझा लंगोटीयार!!! .... गण्या त्या वेळी माझा सख्खा मित्र होता. कोकणात कायमचं राहण्यासाठी देवरूखला पहिलं पाऊल ठेवलं, त्या दिवशी पाऊस कोसळत होता. असा पाऊस आमच्या गावाला पडायचाच नाही. म्हणून मला तो आवडला. एस्टी बसस्टँडवर थांबली, तेव्हा तो कोसळत होता. मी गाडीतून उतरलो अन् स्टँडच्या शेडमध्ये धावत शिरलो, तोवर पुरता भिजलो. अंगातली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language